चांदवड एक ऐतिहासिक वारसा लाभलेला भाग, यातलाच एक भाग म्हणजे तालुक्यातील प्राचीन शनी मंदिर (वर्दडी). येथील इतिहास फार जुना व निराळा आहे. प्राचीन शनी मंदिर हे चांदवड गावाहून साधारणता दहा किलोमीटर ईशान्येस आहे. जाण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटे लागतात. मंदिराची आख्यायिका सांगितली जाते की, 'शनी महात्म्य ऐकत असताना उज्जैनी चा राजा विक्रमादित्य थट्टा करू लागला, काही काळानंतर राजाला साडेसाती सुरू झाली. एकदा शनिदेव उज्जैन नगरीत घोडे विकण्यासाठी व्यापाऱ्याचा वेशात आले, राजाला घोडे फिरून पहा मग मोल कळेल, असे सांगितले. राजा घोड्यावर बसताच घोडा उड्डाण करून वर्दडी येथील अरण्यात डोंगरदरीत सोडून गेला. राजा बराच काळ त्या परिसरात राहिला. पुढे ते तामकेेेढा (चांदवड) नगरीत आला. येथे राजावर चोरीचा आळ आला व शिक्षा म्हणून त्याचे हात-पाय तोडून राजास टाकून देण्यात आले. अशा अवस्थेत तो तेलाच्या घाण्यावर काम करीत असे. बरेच वर्ष लोटले, एके दिवशी रात्रीच्या वेळी राजा 'दीपराग' गाऊ लागला, त्यावेळी चांदवड गावातील सर्व दिवे लागले गेले चांदवड चा राजा चंद्रसेन त्याची मुलगी चंद्रहास्